ट्विटरवर अॅक्टिव्ह झाल्या मायावती

mayawati
नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्या असून ऑक्टोबर २०१८ मध्ये मायावतींनी ट्विटर अकाउंट उघडले होते. पण २२ जानेवारी २०१९ ला त्यांनी त्यांचे पहिले ट्विट केले. त्यात ट्विटरवर सक्रीय होण्याबद्दल त्या बोलल्या होत्या.


आपल्या पहिल्या ट्विटमध्ये असे म्हटले होते, की नमस्कार बंधू-भगिनींनो, पूर्ण आदराने आणि सन्मानाने मी ट्विटवर पाऊल ठेवत आहे. हे माझे पहिले ट्विट आहे. माझे @sushrimayawati हे अधिकृत अकाऊंट असून, या माध्यमातून मी भविष्यात तुमच्या संपर्कात राहील. दरम्यान, बुधवारपर्यंत मायावतींचे अकाउंट टि्वटरने वेरिफाइट केले नव्हते. आता मात्र, त्यांच्या अकाउंटला ब्लू टिक आहे. मायावतींच्या अकाऊंटची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स वाढतच चालले आहेत. आतापर्यंत मायावतींनी १२ ट्विट केले असून, मायावती एकाच व्यक्तीला फॉलो करतात, तर मायावतींचे फॉलोअर्स १६ हजारांच्या घरात आहेत. दरम्यान, लालु प्रसाद यादव यांचा मुलगा आणि आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मायावती यांचे टि्वटरवर स्वागत केले.

Leave a Comment