मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे विवाहबंधनात अडकले. ठाकरे कुटुंबात २८ वर्षांनंतर झालेल्या या लग्नसोहळ्यात संपूर्ण ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते. या लग्नात अनेक राजकीय मंडळींपासून ते बाॅलिवूड आणि उद्योजकांनी हजेरी लावली होती.
या वेळी उद्धव, जयदेव ठाकरे हे सहकुटुंब हजर होते. परळच्या ‘सेंट रेजिस’ या हाॅटेलमध्ये हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळा आटोपल्यानंतर संध्याकाळी ग्रँड रिसेप्शन ही आयोजित करण्यात आले होते.