सिंगापूर आरश्यासारखे लख्ख कसे?

Singapore1
सिंगापूर हा लहानसा देश जगभरातील पर्यटक आकर्षित करतो. ना जास्त उष्ण, ना जास्त थंड असे हे बेट अनेक आकर्षक पर्यटनस्थळांच्या सोबतच स्वच्छ, सुंदर सार्वजनिक ठिकाणांसाठी ही ओळखले जाते. याचे मुख्य कारण असे, की गेली पन्नास वर्षे सिंगापूर देशाने स्वच्छता हे आपले राष्ट्रीय आंदोलन बनविले आहे. स्वच्छता केवळ स्वतःच्या घरापुरती मर्यादित न राखता, सर्व सार्वजनिक ठिकाणे देखील आरश्याप्रमाणे लख्ख असतील हे पाहण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची न मानता, सर्वच नागरिकांनी स्वतः उचलली आहे. सिंगापूरमध्ये अव्याहत सुरु असलेले हे स्वच्छता अभियान देशाचे पंतप्रधान ली कुआन यू यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले.
Singapore
सिंगापूरच्या स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणी करिता अनेक कायदे बनविण्यात आले, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता फैलाविणाऱ्या लोकांना मोठा दंड केला जाऊ लागला. सिंगापूर शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता फैलावणाऱ्या लोकांना कमीत कमी २१७ अमेरिकन डॉलर्सचा दंड आकाराला जातो. अस्वच्छता जितकी जास्त, दंडही तितकाच जास्त आकाराला जात असतो. रस्त्यांवर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, निरुपयोगी वस्तू रस्त्यांवर फेकणे अश्या गोष्टींसाठी या देशामध्ये मोठा दंड केला जात असतो.
Singapore2
सार्वजनिक रस्त्यांवर स्वच्छता सदैव राखली जाईल या करिता अनेक स्वयंसेवक तैनात असतात. सार्वजनिक स्वच्छता उत्तम राहावी या करिता सिंगापूर प्रशासन दर वर्षी ८७ मिलियन डॉलर्स, सफाई कर्मचारी, स्वच्छता करण्याकरिता वापरली जाणारी मशिनरी यावर खर्च करीत असते. सिंगापूरचे हवामान दमट असल्याने येथे किड्यांचा प्रादुर्भाव अधिक लवकर होत असतो. जून ते ऑक्टोबरच्या महिन्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढून या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया सारखे रोग फैलावण्याची शक्यता लक्षात घेऊन या रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासन आधीपासूनच खबरदारी घेत असते.
Singapore3
हा देश स्वच्छ ठेवण्याचे श्रेय प्रशासनाला आहेच, पण या मोहिमेमध्ये नागरिकांचा सहभागही मोठा आहे. १९६८ सालापासून या देशामध्ये सतत स्वच्छता योजना नागरिक राबवीत असून, यामध्ये सर्वांचाच सहभाग असतो. अशा या लहानशा, स्वच्छताप्रिय देशाकडून इतर देशांना बरेच काही शिकण्यासारखे आहे.

Leave a Comment