
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘इंडियन’ या १९९४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सिक्वल ‘इंडियन-२’ येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले.
तुम्ही पाहिले आहे का कमल हसनच्या ‘इंडियन २’ चे नवे पोस्टर ?
#Indian2 pic.twitter.com/zkwlewf9QF
— Shankar Shanmugham (@shankarshanmugh) January 17, 2019
‘२.O’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस शंकर हेच या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहेत. सोशल मीडियावरून त्यांनीच चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. कमल हसन यात एका वृध्द व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहेत. या पोस्टरसोबतच चित्रपटाच्या चित्रीकरणाबद्दलही माहिती देण्यात आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय चित्रपटातून उर्मिला मातोंडकर आणि मनीषा कोईराला या अभिनेत्रीदेखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
