हा दाक्षिणात्य अभिनेता ‘दबंग ३’ चित्रपटात साकारणार खलनायक

dabaang-3
बॉलिवूड भाईजान सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अशात भाईजान आता याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात खलनायकाची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न पडला असतानाच याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.

सोनू सूदने पहिल्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. आता या जागी एका दाक्षिणात्य कलाकाराची वर्णी लागली आहे. हा कलाकार इतर कोणीही नसून कन्नड अभिनेता किच्चा सुदीप हा आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे म्हटले जात आहे.

अरबाज खानद्वारा दिग्दर्शित ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ च्या धमाकेदार यशानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रेक्षकही भाईजानच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment