
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी मणिकर्णिका – द क्विन ऑफ झाँसी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग करण्यात आले होते. अनेक दिग्गजांची राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या स्क्रिनिंगला उपस्थिती होती. राष्ट्रपतींनी यावेळी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले.
राष्ट्रपतींसाठी मणिकर्णिका – द क्विन ऑफ झाँसी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग
मणिकर्णिका चित्रपटाची संपुर्ण टीम राष्ट्रपती भवनात रंगलेल्या या खास शोसाठी हजर होती. कंगना रानावतसह सर्व कलाकार आणि निर्मिती प्रक्रियेत असलेल्या सर्वांचे कौतुक राष्ट्रपतींनी केले. या स्क्रिनिंगसाठी राष्ट्रपतींसह लालकृष्ण अडवाणी, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि मणिकर्णिका चित्रपटाचे संवाद आणि गीत लेखन करणारे प्रसून जोशी यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली होती.
