ऑस्ट्रेलियात युझवेंद्र चहलची विक्रमी कामगिरी

Yuzvendra-Chahal
मेलबर्न – मेलबर्न येथे खेळला गेलेला ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकत मालिका 2-1ने आपल्या खिशात घातली. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. युझवेंद्र चहलने कोहलीचा हा निर्णय सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज बाद केले. ऑस्ट्रेलियाचा संघ त्याच्या या कामगिरीमुळे २३० धावांत सर्वबाद तर झालाच याशिवाय चहलच्या नावे अनेक विक्रम जमा झाले.


ऑस्ट्रेलियात ६ गडी बाद करणारा युझवेंद्र चहल पहिला फिरकीपटू ठरला आहे. याआधी रवि शास्त्री यांनी १९९१ साली १५ धावा देवून ५ विकेट घेतल्या होत्या. चहलच्या आधी फक्त ७ फिरकीपटूंना एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेता आले आहेत. अजित आगरकरच्या नावे ऑस्ट्रेलियात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीतील प्रदर्शन होते. त्याने ९ जानेवारी २००४ साली मेलबर्न येथेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४२ धावा देताना ६ गडी बाद केले होते. त्याची चहलने बरोबरी केली.

Leave a Comment