करणी सेनेच्या धमक्या थांबल्या नाहीतर एकालाही सुट्टी नाही – कंगणा

kangana-ranuat
येत्या 25 जानेवारीला कंगना राणावताचा प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा वादात सापडला असून या चित्रपटावरून करणी सेनेकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. करणी सेनेने जर मला धमक्या देणे थांबवले नाही तर मी एकालाही सुट्टी देणार नाही, मीदेखील एक राजपूत आहे हे त्यांनीही लक्षात ठेवावे अशा इशारा कंगनाने दिला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटावर आक्षेप नोंदवत निर्मात्यांना करणी सेनेच्या महाराष्ट्र विभागाने पत्र पाठवले आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा करणी सेनेचा आरोप आहे. काही आक्षेपार्ह दृश्य चित्रपटात दाखवली असतील तर निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असेही या पत्रात म्हटले होते.

कंगनाने या संपूर्ण प्रकरणावर निषेध नोंदवला आहे. मला ‘मणिकर्णिकाच्या प्रदर्शनावरून करणीसेनेकडून धमक्या येत आहेत. करणी सेनेने असेच सुरू ठेवले तर मात्र मी एकालाही सोडणार नाही मी देखील एक राजपूत आहे’ अशा तीव्र शब्दात कंगनाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत जशास तसे उत्तर करणी सेनेला दिले आहे.

Leave a Comment