मोदी यांच्या मुलाखतीवर राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून टीका

raj-thakre
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवर व्यंगचित्रातून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी ही मुलाखत म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारल्यासारखे होते अशी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात नरेंद्र मोदीच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी बोला काय विचारु ? असे विचारत असल्याचे दाखवले आहे. एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असल्याचे म्हणत मुलाखतीचे सर्व वातावरण मोदीमय राज ठाकरे यांनी दाखवले आहे.

एएनआयला नुकतीच नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली असून अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी यावेळी दिली. नरेंद्र मोदी यांनी तब्बल 95 मिनिटांची एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांना मुलाखत दिली. त्यांनी यावेळी नोटाबंदी, गांधी घराणे, उर्जित पटेल राजीनामा, जीएसटी, काळा पैसा, भाजपचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अशा विविध विषयांवर मते मांडली. तसेच भारतीय जनता पक्षावरच 2019 मध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवतील असेही मोदी म्हणाले होते.


पण आधीपासूनच मुलाखतीचे प्रश्न ठरले होते अशी टीका विरोधक करत आहेत. काँग्रेसने मोदींची मुलाखत झाल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत ही मुलाखत म्हणजे फक्त मीपणा असल्याची टीका केली होती.

Leave a Comment