सोशल मिडियावर एका महिलेने शेअर केली पोट कमी करण्याची ही सिक्रेट पद्धत

stomach
सोशल मीडियावर सध्या कॉलीन नावाच्या महिलेने शेयर केलेले फोटो व्हायरल होत असून कॉलिनने या पोस्टमध्ये सांगितले की, तिचे फिगर तीन मुलांच्या जन्मानंतर खराब झाले होते. त्यामुळे पुन्हा चांगले फिगर मिळवण्यासाठी तिने एक चमत्कारिक पद्धतीचा अवलंब केला. तिने या पद्धतीचा वापर काही रात्री केला आणि त्यातून मिळालेल्या रिझल्टने ती खूपच आनंदी झाली.

याबाबत कॉलीनने दावा केला आहे की, अगदी सहज या पद्धतीने पोट कमी करता येऊ शकते. मार्केटमधून कॉलीनने सीवीड (समुद्री शेवाळ) लोशन खरेदी केले. त्याशिवाय पोटावर बांधण्यासाठी तुम्हाला प्लास्टीकची गरज असते. काही रात्रींना कॉलीनने पोटावर सीवीड लोशन लावल्यानंतर पोटावर प्लास्टीक बांधले. प्लास्टिक पोटावरून सरकू नये म्हणने कॉलीन त्यावर बँडेज बांधायची. त्यानंतर ती झोपी जायची. कॉलीनने काही रात्रींसाठी हा प्रयोग करून पाहिला. तिने दावा केला आहे की, यामुळे दररोज रात्री एक इंचापर्यंत पोट कमी होते.

Leave a Comment