
चीनी मोबाईल कंपनी आयवूमीने त्यांचा नवा स्मार्टफोन आयवूमी आय २ मंगळवारी बाजारात आणला असून त्याला थ्री डी मिरर फिनिश दिले गेले आहे. फुलव्ह्यू डिस्प्लेचा हा फोन अवघ्या ७४९९ रुपयात फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आयवूमीचे इंडिया प्रमुख अश्विन भंडारी यांनी हा फोन युवकांना आवडेल आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
थ्री डी मिरर फिनिशसह आला आयवूमीचा आय २ स्मार्टफोन
या फोनला फुलव्ह्यू डिस्प्लेसह फेस रेक्ग्नीझेशन फिचर दिले गेले आहे. तो ड्युअल अॅक्टीव्ह फोर जी व्होल्टला सपोर्ट करतो. ५.४५ इंची फुल एचडी स्क्रीन, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, मायक्रो एसडी कार्डने ते १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ आणि २ एमपीचे रिअर कॅमेरे फ्लॅश सह तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा ४००० एएमएचची टू ए फास्ट चार्ज टेक्निकची बॅटरी अशी त्याची अन्य फीचर्स आहेत.
