१३ ते १६ मे दरम्यान फ्लिपकार्टचा मेगा सेल


नवी दिल्ली – ग्राहकांसाठी अॅमेझॅान आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपंन्या मेगा सेल घेऊन येत असून सेलची फ्लिपकार्टने घोषणा देखील केलेली आहे. १३ ते १६ मे दरम्यान फ्लिपकार्टचा ‘बिग शॉपिंग डेज’ सेल असणार आहे. ग्राहकांना या चार दिवसांच्या सेलमध्ये उत्पादनांवर विशेष सवलत मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याच काळात अमेरिकन कंपनी अॅमेझॅान देखील सेल आणणार आहे. मोठे सेल आणण्याऐवजी, छोट्या मात्र आकर्षक सेलची मालिका अॅमेझॅान कंपनी घेवून येणार असल्याचे अॅमेझॅान इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना दोन्ही कंपन्या कॅशबॅक ऑफर, नो कॉस्ट ईएमआय अशा सवलती देणार आहेत. फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग डेज सेलमध्ये लॅपटॉप, कॅमेरा, पॉवर बॅंक्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक गैजेट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तर टीव्ही आणि इतर वस्तूंवर ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यात काही मोबाईल फोन्सची फ्लॅश सेलमध्ये विक्री होणार आहे. फ्लिपकार्टने सेलच्या दरम्यान काही गेम्स ही ठेवलेले आहेत ज्यात विजेत्यांना १ रुपयामध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि इतर वस्तू जिंकण्याची संधी आहे. याशिवाय वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक मिळू शकते.