असा आहे अंबानींचा होणारा जावई!


देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी, तिचा प्रियकर आनंद पिरामल याच्यासोबत विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली असून, या जोडीच्याच प्रेमकहाणीच्या चर्चा सध्या अनेक क्षेत्रांमध्ये आहेत. आनंदने इशाला महाबळेश्वरला देवाच्याच साक्षीने एका मंदिरात प्रपोज केल्यानंतर या सुरेख क्षणाचा आनंद दोघांनीही कुटुंबियांसोबत साजरा केला.

सध्याच्या घडीला पिरामल उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालक पदी आनंद असून, या समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायावर लक्ष ठेवून आहे. आनंदने वडील अजय पिरामल यांना व्यवसायात साथ देण्यापूर्वी ‘पिरामल ई- स्वास्थ्य’ या स्टार्ट- अपची सुरुवात केली होती. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठाच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्याशिवाय आनंदची इंडियन मर्चंट चेंबरच्या- युथ विंगचा सर्वात तरुण अध्यक्ष म्हणूनही वेगळी ओळख आहे.

आनंदविषयीची बरीच माहिती पिरामल समूहाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आनंदला ‘हॅलो’ मासिकातर्फे देण्यात येणारा हुरुन इंडिया अँड यंग बिजनेस लिडरचा ‘हुरुन रिअल इस्टेट युनिकॉर्न ऑफ द इयर २०१७’ या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. पिरामल समूहाच्या वतीने रिअर इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता, अशी माहिती पिरामल समूहाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आनंद काही दिवसांपूर्वीही प्रकाशझोतात आला होता. त्यामागे खुद्द मुकेश अंबानी कारण ठरले होते. आनंदने त्यांचे व्यवसाय क्षेत्रात उडी घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करण्यासाठी आभार मानले होते. ज्यामुळे तो बराच चर्चेत होता.यंदाच्या वर्षअखेर म्हणजेच डिसेंबर महिन्यात इशा आणि आनंद विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment