
इनफोकस कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन इनफोकस व्हिजन ३ प्रो भारतात लाँच केला असून त्याची किंमत आहे १०,९९९ रुपये. या फोनला दोन सीम वापरता येतात तसेच एक सीम आणि मायक्रोएसडी किंवा एक सीएम वापरण्याची सुविधा दिली गेली आहे.
इनफोकसचा व्हिजन ३ प्रो भारतात लाँच
या फोनसाठी ५.७ इंची एचडी डिस्प्ले, अँड्राईड ७.० नगेत ओएस, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज, मायक्रो कार्डचा सहाय्याने ते १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. त्याचबरोबर एलईडी फ्लॅश सह १३ व ८ इम्पिचे दोन रिअर कॅमेरे, फिंगरप्रिंट सेन्सर, सेल्फी साठी १३ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. फोनची बॅटरी ४ हजार एमएएचची आहे. हा फोन अर्ध्या सेकंदात अनलॉक होतो असा कंपनीचा दावा आहे. गोल्ड आणि ब्लॅक रंगात तो उपलब्ध आहे.
