आनंद महिंद्रा हे वेगवेगळे मजेशीर ट्वीट करत कायमच ट्विपल्सचे लक्ष वेधून घेतात. त्यांनी असेच एक मजेशीर ट्विट नुकतेच केले आहे ट्विटवर जे चांगलेच ट्रेंड होत आहे. त्यांनी यावेळी एक मजेशीर फोटो ट्विट केला असून अंड्याने भरलेली एक व्हॅन यामध्ये दिसत आहे. आता हे नेहमीचेच चित्र असले तरीही यामध्ये एक विशेष गोष्ट आहे. अंड्याचे ट्रे गाडीतून खाली पडू नयेत म्हणून एक मुलगा त्यासमोर बसल्याचे यामध्ये दिसते आहे.
A message to our auto styling team: Before you decide to delete a rear-mounted spare wheel on any of our vehicles, please do keep some unique & unpredictable customer applications in mind!! pic.twitter.com/seSHxTci4L
— anand mahindra (@anandmahindra) February 14, 2018
आता एरवी टेम्पो किंवा ट्रकमध्ये सामान वाहून नेताना ते रस्सीने बांधले जाते. पण एक मुलगा या टेम्पोला असलेल्या जादाच्या चाकावर अतिशय हास्यास्पद पद्धतीने बसलेला दिसतो. महिंद्रा कंपनीच्या भारतातील डिझाईन टीमला त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये टॅग केले आहे. भारतात ग्राहक गाडीला जास्तीचे चाक लावताना प्रत्येक गोष्टीचा कसा वापर करतात हे आपल्याला लक्षात घेऊन गाडीचे डिझाईन तपासायला हवे. त्यामुळे काहीतरी हटके आणि सहज अंदाज बांधता येणार नाही असे काहीतरी डोक्यात ठेवा असा सल्लाही दिला आहे.