अनिमिया पासून बचावासाठी हे उपाय अवलंबा


जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमी निर्माण होते, म्हणजे शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊ लागते, तेव्हा अनिमिया ही स्थिती निर्माण होते. लहान मुले तसेच गर्भावस्थेतील महिलांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. बाजारामध्ये सहज उपलब्ध असलेली फळे आणि भाज्या व इतर काही पदार्थांच्या नियमित सेवनाने अनिमिया दूर होण्यास सहाय्य मिळू शकते. या पदार्थांना आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास हिमोग्लोबीनची पातळी सुधारण्यात मदत होईल.

बीटामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीराचे ‘क्लेन्जिंग’ होण्यास मदत मिळते, म्हणजेच याच्या सेवनाने शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते. दररोज एक ग्लास बीटाचा रस प्यायल्याने शरीरामध्ये प्राणवायूचा संचार वाढतो. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जर बीटाचा रस आवडत नसेल, तर बीट कच्चे खावे किंवा बीट उकडून घेऊन त्याची कोशिंबीर करून नियमित खावी.

शरीरामध्ये अन्नामार्फत येत असलेले लोह शरीरामध्ये अवशोषित करण्यासाठी क जीवनसत्वाची गरज असते. क जीवनसत्व असलेले पदार्थ घेतल्याने शरीरामध्ये लोह उत्तम प्रकारे अवशोषित होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढू लागते. यासाठी डाळींबाच्या रसाचे सेवन करावे. एका तलम, स्वच्छ कपड्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालावेत आणि ते पिळून त्याचा रस काढून घ्यावा. एका वेळी एक कप रस, चिमुटभर दालचिनीची पूड आणि आवडत असल्यास थोडासा मध घालून सेवन करावा. हा रस पिताना सावकाश, एकेक घोट प्यावा, अन्यथा तो उलटून पडण्याची शक्यता असते.

अनिमिया दूर करण्याकरिता खजूर हा देखील चांगला पर्याय आहे. खजुराच्या सेवनानेही शरीरामध्ये लोह चांगल्या प्रकारे अवशोषित होते. खजुराचे सेवन करण्याकरिता दोन खजूर रात्रभर एक कप दुधामध्ये भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे दुध पिऊन खजूर खावेत. त्याचप्रमाणे अनिमिया दूर करण्यासाठी केळ्याचे सेवनही फायदेशीर आहे.

आपल्या आहारामध्ये ताज्या, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश अवश्य करावा. मेथी, लेट्युस, ब्रोकोली, ह्या भाज्या लोहाचे उत्तम स्रोत आहेत. या भाज्यांमध्ये बी १२ जीवनसत्व, फोलिक अॅसिड, आणि शरीराला उर्जा देणारी इतर पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. या पोषक द्रव्यांमुळे अनिमिया दूर होण्यास मदत मिळते. ह्या भाज्यांचा ज्यूस घेणे ही चांगले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment