
टेलिकॉम क्षेत्रात दंगल माजविणार्या रिलायन्स जिओ ने नवीन वर्षात प्रीपेड युजर्ससाठी दोन नव्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जिओ युजर्सना नवीन वर्षाच्या या शुभेच्छा असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने १९९ व २९९ हॅपी न्यू इयर प्लॅन सादर केले आहेत. यात पहिल्यापेक्षा जास्त इंटरनेट डेटा युजरला मिळणार आहे.
जिओच्या हॅपी न्यू इअर ऑफर्स
पहिल्या १९९ प्लॅन मध्ये युजरला १.२ जीबी हायस्पीड फोर जी डेटा रोज मिळणार आहे त्याचबरेाबर फ्री व्हॉईस कॉलिग, अनलिमिटेड एसएमएस व २८ दिवस सर्व प्राईम मेंबर्सना जिओ अॅप सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. ज्यांचा डेटा वापर अधिक आहे त्यांना २९९ प्लॅनमध्ये दररोज २ जीबी फोरजी डेटा, अनलिमिटेड एसएमएस व २८ दिवस जिओ अॅप सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे.
