हे ठरले २०१७ मधले सर्वात धोकादायक पासवर्ड


इंटरनेट पासवर्ड सुरक्षा व डेटा सेफ्टीसाठी काम करणार्‍या स्प्लॅशडेटा कंपनीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षाची म्हणजे २०१७ सालाची यादी प्रसिद्ध केली असून त्यात या वर्षात सर्वात धोकादायक म्हणजे हॅक होण्यासाठी अगदी सुलभ ठरलेल्या पासवर्डची यादी जाहीर केली आहे. सर्वात वीक पासवर्डच्या या यादीत कॉमन पासवर्ड अधिक संख्येने आहेत. यातील टॉप १० मध्ये आपला पासवर्ड असेल तर आपण तो त्वरीत बदलावा असा सल्लाही कंपनीने दिला आहे.

या यादीत पहिल्या नंबरवर १२३४५६ हा पासवर्ड आहे. गेल्यावर्षीही हाच पासवर्ड पहिल्या नंबरवर होता. गेल्या वर्षी ४ नंबरवर असलेला पासवर्ड हा पासवर्ड यंदा दोन नंबरवर आहे.१२३४५६७८, क्यूडब्लूइआरटीवाय, १२३४५, १२३४५६७८९, हे पासवर्डही या यादीत आहेत. यंदा या यादीत लेटमीन हा नवीन पासवर्डही सामील झाला आहे. फुटबॉल, आय लव्ह यू हे पासवर्डही धोकादायक पासवर्डच्या यादीत आहेत. हे पासवर्ड हॅकर्सना हॅक करण्यास अगदी सोपे असल्याचे व त्यामुळे युजरच्या डेटाला धोका निर्माण होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment