नासाने लावला नव्या सूर्यमालेचा शोध


नव्या सूर्यमालेचा शोध अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने लावला आहे. हा शोध ‘केप्लर स्पेस’ टेलिस्कोपद्वारे घेण्यात आला आहे. हे नासाचे सर्वात मोठे यश मानले जाते आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नासा सध्या गूगलसोबत ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेते असून या नव्या सूर्यमालेचा शोध केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे लावण्यात आला आहे. ८ ग्रह या सूर्यमालेत असून अद्याप नासाकडून या संदर्भातील कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.


ज्याप्रमाणे सूर्याभोवती आपल्या सूर्यमालेतील ग्रह फिरत आहेत अगदी त्याचप्रमाणे एका ताऱ्याभोवती ग्रह या नव्या सूर्यमालेतही फिरत आहेत. या सूर्यमालेत पृथ्वीसारखा एखादा ग्रह आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. पण ‘केप्लर ९०’ नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने इतर ग्रह फिरताना नव्या सूर्यमालेत दिसत आहेत असे नासाने म्हटले आहे. पृथ्वीपासून २ हजार ५४५ प्रकाश वर्षे लांब ही नवी सूर्यमाला असल्याची माहितीही समोर आली आहे.

पृथ्वीच्या तुलनेत ही नवी सूर्यमाला ३० टक्क्यांनी मोठी आहे. अँड्र्यू व्हेंडरबर्ग या खगोलशास्त्रज्ञाने तुम्हाला भेट द्यायला आवडेल अशी ही सूर्यमाला नाही. असे मत नोंदवले आहे. नासाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नवी सूर्यमाला कशी आहे या संदर्भातले काही व्हिडिओही शेअर केले आहेत.

Leave a Comment