वजन घटविण्यासाठी या अन्नपदार्थांचे कॉम्बिनेशन प्रभावी


वजन घटविण्यासाठी सतत व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेऊन देखील मनासारखे परिणाम पहावयास मिळत नसतील, तर आपण जो आहार घेत आहात, त्यापैकी काही पदार्थ जोडीने, म्हणजेच कम्बाईन करून खाल्ल्यास वजन घटविण्यात मदत मिळू शकते. आपला आहार आपल्या शरीराचा मेटाबोलिक रेट वाढविणारा हवा. त्याचबरोबर शरीराला पोषण देऊन अतिरिक्त चरबी घटविण्यास पूरक ही हवा. त्यामुळे त्यादृष्टीने दोन खाद्यपदार्थांचे कॉम्बिनेशन करून आपण आपल्याला इच्छित परिणाम मिळवू शकतो.

ब्रोकोली ही भाजी फ्लॉवरच्याच परिवारातील असून, या मध्ये कर्बोदके आणि फॅट्स चे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. यामध्ये पाण्याची मात्रा अधिक आहे. त्यामुळे याच्या सेवनाने वजन घटण्यास मदत होते. ब्रोकोली टोमॅटो बरोबर खाल्ल्यास याचे फायदे दुणावतात. टोमॅटो मध्ये क जीवनसत्व आणि बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटो आणि ब्रोकोली हे कॉम्बिनेशन वजन घटविण्यासाठी उत्तम आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ब्रोकोली घालून केलेले टोमॅटोचे सूप घ्यावे.

अंड्याचा पांढरा भाग आणि पालक हे कॉम्बिनेशन देखील अतिशय प्रभावी आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रथिने भरपूर मात्रेमध्ये असतात, तर पालकामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही पदार्थ वापरून बनविलेले ऑमलेट सकाळच्या नाश्त्याला खावे. त्यामुळे दिवसभर काम करण्याची ताकद देणारी प्रथिने तर मिळतातच, शिवाय फायबर भरपूर मिळाल्याने सतत भूक लागत नाही.

ब्लू बेरीज आणि ओटमील हे कॉम्बिनेशन दोन जेवणांच्या मधल्या वेळेला लागणाऱ्या भुकेकरिता उत्तम पर्याय आहे. या दोन्हीमध्ये सोल्युबल फायबर भरपूर मात्रेमध्ये असल्याने परत परत भूक लागत नाही, व पोट पुष्कळ वेळ भरलेले राहते. त्यामुळे येता जाता काहीतरी तोंडात टाकण्याचा मोह आवरणे सहज जमून जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment