
नवी दिल्ली : विमान कंपनी गो एअरने देशांतर्गत स्वस्त विमान प्रवासाची संधी दिली असून दिल्ली, कोची आणि बंगळुरुसह सात शहरांसाठीचे विमान तिकीट कंपनीने ३१२ रुपयांपासून ठेवले आहे.
गोएअर घडवणार केवळ ३१२ रुपयात विमान प्रवास
या ऑफरनुसार २४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या काळात तिकीट बुकिंग सुरु राहिल. १ डिसेंबर २०१७ ते २८ ऑक्टोबर २०१८ या दरम्यान या तिकिटांवर कधीही प्रवास करता येईल. ही बुकिंग अगोदर येईल, त्याला तिकीट, या आधारावर सुरु आहे. ही तिकीट बुकिंग मुंबईतील कंपनीच्या मुख्यालयाबाहेर सुरु असून या तिकिटामध्ये कराचा समावेश करण्यात आलेला नाही. ही विशेष ऑफर दिल्ली, कोची, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि लखनौ या मार्गांवर उपलब्ध आहे.
