मुंबई ते गोवा क्रूझ प्रवासाला ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरुवात


मुंबई : आता ख्रिसमचा मुहूर्त मुंबई ते गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रूझ प्रवासाला सापडला असून मुंबई-गोवा दरम्यानच्या कोकणातील ७२ ठिकाणी या जेट्टी उभारण्यात येणार असून प्रवासी आणि पर्यटकांसाठी २५ डिसेंबरला हा जलप्रवास सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. गोव्याला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता आंतरराष्ट्रीय क्रूझने जलप्रवास करता येणार आहे. कोकणातील ७२ ठिकाणच्या जेट्टी निर्मितीनंतर ७०० किमी समुद्राचे अंतर पार करुन गोव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होणार असल्यामुळे अनेक कोकणवासियांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Leave a Comment