
नवी दिल्ली : जिओने आपल्या प्राईम ग्राहकांसाठी नवीन प्लॅन्सची घोषणा केली असून जिओ आपल्या विशेष ग्राहकांना या प्लॅन्समध्ये अनेक सुविधांसह २५९९ रुपये नकदी स्वरूपात कॅशबॅक देणार आहेत. तुम्ही काही ठराविक जागी खरेदी करताना ज्याचा वापर करू शकता. कंपनीने सांगितले की, जिओने अमेजनपे, पेटीएम व फोनपे यांसारख्या अनेक कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. प्राईम ग्राहकांना या प्लॅनमध्ये ३९९ रुपये व त्याहून अधिक रूपयांच्या रिचार्जवर ४०० रुपयांचे व्हाउचर मिळेल. तर प्रत्येक रिचार्जवर जिओचे पार्टनर ३०० रुपये तात्काळ कॅशबॅक देतील.
जिओने आणली प्राईम ग्राहकांसाठी ट्रिपल कॅशबॅक ऑफर
कंपनीने सांगितले की, जिओ ग्राहकांना अजियो डाट कॉमवर १५०० रुपयांची खरेदीवर ३९९ रुपयांची सूट दिली जाईल. तर यात्रा डॉट कॉमवर विमान तिकीट खरेदीवर १००० रुपयांची सूट मिळेल. रिलायंसट्रेंड्स वर १९९९ रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांची सूट कंपनीच्या प्राईम ग्राहकांना मिळेल. जिओ प्राईम ग्राहकांना या संधीचा लाभ १० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत घेता येईल. दूरसंचार कंपन्या ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी नवनवीन योजना जाहीर करत आहेत. व्होडाफोन, एअरटेलने देखील अलीकडेच त्यांच्या नव्या योजना जाहीर केल्या.
