लवकरच बंद होणार या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप सेवा


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप चांगलेच चर्चेत आहे. व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याच्या कारणामुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप यावर्षानंतर काही फोन्सवर बंद होणार आहे. कंपनीने याआधीही याची माहिती दिली होती. पण तारीख वाढण्यात आली होती. व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर्स आता अ‍ॅन्ड्रॉईड किंवा विंडोजचे जूने व्हर्जन आणि काही आणखी प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करणार नसल्यामुळे या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर बंद केले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. पण ही सेवा कधीपासून बंद होईल याबाबतची अधिकॄत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप २००९ मध्ये लॉन्च झालेल्या सेकंड जनरेशनच्या अ‍ॅपल आयफोन ३GS आणि iOS६ ऑपरेटींग सिस्टम असलेल्या फोनवर काम करणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपला या फोनची ऑपरेटींग सिस्टम सपोर्ट करत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड २.१ आणि २.२ ऑपरेटींग सिस्टम असलेल्या मोबाईलवरही चालणार नाही. या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. पण ही तारीख अधिकृत नाही आहे.

व्हॉट्सअ‍ॅपची विंडोज ७ ऑपरेटींग सिस्टम असलेल्या सर्वच स्मार्टफोनवरून सेवा बंद होईल. ऑक्टोबर २०१०मध्ये मायक्रोसॉफ्टने हे लॉन्च केले होते आणि २०१४ मध्ये बंद केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप नोकिया एस४० आणि नोकिया सिम्बियन एस६० मध्ये सुद्धा बंद होणार आहे. ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतचा वेळ या फोनच्या यूजर्सना देण्यात आला आहे.

आपल्या स्मार्टफोनची निर्मिती ब्लॅकबेरीने बंद केली आहे. या फोनवर आपली सुविधा सुद्धा बंद करण्याची घोषणा व्हॉट्सअ‍ॅपने केली आहे. ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी १० वर आता व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा मिळणार नाही. तर काही फोनची ही सुविधा बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment