
अॅपल फोटोज या फिचरमधील एका फोल्डरमुळे सोशल मिडीयावर हंगामा सुरू झाला आहे. या नव्या शोधामुळे जास्त करून महिला वर्ग हैराण बनला असून आपले कोणकोणते फोटो येथे स्टोअर झाले अ्रसावेत अशी चिंता त्यांना ग्रासते आहे. अॅपल मशीन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयफोन फोटो लायब्ररी अॅप फोटोज मध्ये असा सेमी न्यूड फोटोचा फोल्डर आपोआप तयार होत असल्याचे दिसून आले आहे.
आयफोन फोटो अॅपमध्ये स्टोअर होताहेत सेमी न्यूड फोटो
मिळालेल्या माहितीनुसार एका महिला युजरने ब्रेसियर असा सर्च केला तेव्हा त्यात महिलांनी ब्रेसिअर्स, लिंगरीज व बिकीनीमध्ये काढलेल्या सेल्फींचा फोल्डर बनत असल्याचे लक्षात आले. लर्निग मशीन असे फोटो खास टॅग करून एकत्र करत असल्याचेही आढळले.त्यात सेमी न्यूड फोटो आपोआपच स्टोअर होत आहेत. वास्तविक हे अॅप फिचर नवे नाही मात्र अचानकच या नव्या फिचरचा शोध लागला आहे. आता महिला वर्गाला हे फोटो अॅपल डेटामध्येही एकत्र होताहेत काय याची चिंता सतावते आहे. तसे घडत असेल तर महिला युजरची प्रायव्हसी धोक्यात आली आहे असे सिद्ध होणार आहे.
