
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) पूढील महिन्यात पीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ होणार असून याचा लाभ ईपीएफओच्या ५ कोटीहून अधिक ग्राहकांना मिळणार आहे.
तुमच्या पीएफ अकाऊंटमधील रक्कम पुढील महिन्यात वाढणार आपोआप
नोव्हेंबर महिन्यात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पीएफ खातेधारकांच्या खात्यात एक्सचेंज ट्रेडड फंड (ईटीएफ) मध्ये गुंतवलेल्या रकमेचा काही हिस्सा जमा करण्यात येणार आहे. ईटीएफ एक प्रकारचे स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक आहे, बॉण्डच्या माध्यमातून हे करण्यात येते.
ईपीएफओच्या या निर्णयाला कॅगने मंजूरी दिली असून श्रम मंत्रालयातील सुत्रांच्या मते, कॅगकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी या वर्षाच्या सुरुवातीला सीबीटीच्या बैठकीत पाठवण्यात आला होता. पण या प्रस्तावावर सहमती दर्शवत कॅगने काही आक्षेप घेतले आहेत. आगामी बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
ईपीएफओद्वारे ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा या वर्षाच्या अखेरपर्यंत ४५ हजार कोटींवर पोहोचणार आहे. ईटीएफमध्ये ऑगस्ट २०१५ पासून गुंतवणूक करण्यास ईपीएफओने सुरुवात केली होती. पूर्वी ५ टक्के गुंतवणूक होती मात्र, आता ही गुंतवणूक वाढून १५ टक्के करण्यात आली आहे.
