कर्मचारयांना मस्त सोयी पुरविणारया कंपन्या


नोकरी शोधताना प्रत्येकजण आपल्याला कोणत्या कंपनीत चांगला पगार मिळेल, कुठे सोयी चांगल्या असतील, कुठल्या कंपनीत अधिकाधिक फायदे देतील याचा शोध नक्कीच घेत असतो. कंपन्याही आपल्या सेवेतील कर्मचार्‍यांना चांगले फायदे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करत असतात पण त्यामागे आपल्याकडचे गुणी, हुषार कर्मचारी अन्यत्र जाऊ नयेत यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. बहुतेक कंपन्यातून वर्षातून एकदा पगारवाढ दिली जाते. आजकाल सक्षम गुणवंत नोकरदारांची गरज तीव्र स्पर्धेमुळे बहुतेक सर्व क्षेत्रातील कंपन्यांना भासते आहे व यामुळे दुसर्‍या कंपन्यातील असे कर्मचारी आपल्याकडे यावेत यासाठीही कंपन्या कांही ऑफर्स आवर्जून देताना दिसत आहेत.

उहाहरणच द्यायचे तर शीतपेये बनविणार्‍या कोकाकोला इंडियाने त्यांच्या कर्मचार्‍यांच्या परफॉर्मन्सनुसार वर्षाऐवजी दर महिन्याला अप्रेझल देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. उत्पादनात वाढ व्हावी आणि आपल्याकडील नोकरदारांनी अधिक मेहनत घ्यावी यासाठी ही घोषणा केली असली तरी कामातील प्रगती व कंपनीची प्रगती अशा दोन्ही बाबी प्रत्यक्षात दिसल्या तर त्यानुसार अप्रेझल होणार आहे.


गुगल मध्ये नोकरी मिळावी अशी इच्छा कुणाला नसेल? नोकरी संदर्भात गुगलची लोकप्रियता खूपच आहे. ही कंपनी त्यांनी पारखून घेतलेल्या लोकांनी दुसरीकडे पाहू नये यासाठी भलेभक्कम पगार तर देतेच पण कामासाठी चांगले वातावरणही पुरविते. जेवण, जिम, कपडे धुण्याची सुविधा, केस कापण्याची सुविधा, मसाज पार्लर सुविधा येथे मोफत आहेच शिवाय कार वॉश, ऑईल चेंज, चाईल्ड केअर या सुविधाही देते. मुलांसाठी पालकांना भराव्या लागणार्‍या शैक्षणिक शुल्कापैकी वर्षाला १२ हजार डॉलर्स कंपनीकडून रिअेंबर्स करून घेता येतात.


मायक्रोसॉफ्ट ही साॅफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनीही त्यांच्या कर्मचार्‍यांची विविध प्रकारे काळजी घेते. लंच टाईममध्ये बास्केट बॉल, सॉकर खेळणे येथे शक्य आहे तसेच जागोजागी पिन बॉल मशीन्सही बसविली गेली आहेत. पूल टेबल, वेळीअ्रवेळी लागलेली भूक शमविण्यासाठी ११ रेस्टॉरंटस, ड्रायक्लिनिंगची सुविधा तसेच रिटेल स्टोअर्स सुविधाही येथे दिली जाते.


फेसबुक ही जगभरात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली कंपनी. त्यांचे ऑफिस कॉम्प्युटर अॅक्सेसरीजचे वेंडींग मशीन, व्हिडीओ लायब्ररी, ट्रेडमील टेबल, केस कापणे दुकाने व १०० रेस्टॉरंटस व कॅफे अशा सुविधांनी युक्त आहे. या सार्‍या सुविधा अगदी स्वस्तात अथवा त्यातील कांही पूर्ण मोफत वापरता येतात.


एनसी जॉन्सन्स ही हाऊसहोल्ड क्षेत्रातील कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना पेड मॅटर्नल तसेच पॅटर्नल रजेची सुविधा देतेच शिवाय चाईल्ड केअर सुविधाही पुरविते. येथे दरवर्षी १ वर्षभर सुट्टी घेण्याची सुविधा आहे त्याचबरोबर वर्षातून नऊ सुट्या घेता येतात. उन्हाळ्याच्या दिवसात शुक्रवारी पेड हाफ डेही घेता येतो.


लिंक्डइन कंपनी कर्मचार्‍यांना चांगला पगार देतेच पण सुविधाही अनेक देते. येथे कंपनीच्या हिताचे कांही काम कर्मचार्‍याच्या हातून झाले तर त्याला बक्षीस दिले जातेच पण त्याच्या आवडीच्या कामाचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी प्रशिक्षण व त्याच्या खर्चाची सुविधा देते.


विजा कार्ड कंपनी त्यांच्या कर्मचार्‍यांना मनोरंजन करून घेण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यात मोठमोठ्या कॉन्सर्टची तिकीटे, एम्युझमेंट पार्कसाठीची तिकीटे सवलतीच्या दरात दिली जातात शिवाय ग्रुप एक्सरसाईज क्लास, स्पोर्टस क्लब साठी शुल्क भरते. चांगले काम करणार्‍यांना बक्षीसेही दिली जातात.

Leave a Comment