
नवी दिल्ली : रिलायन्स जिओनेही ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे फेस्टिव्हल ऑफर लॉन्च केली असून रिलायन्स जिओने या फेस्टिव्हल सीझनमध्ये त्यांच्या जिओफाय डोंगलची किंमत १९९९ रूपयांहून केवळ ९९९ रूपये केली आहे.
आता केवळ ९९९ रूपयांमध्ये मिळवा जिओफाय डोंगल
त्यामुळे तुम्हाला आता जिओफाय डोंगलवर चक्क १ हजार रूपयांची सूट मिळत आहे. जे २० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जिओफाय वरील ही ऑफर त्याच ग्राहकांना मिळणार जिओफाय डोंगल खरेदी करतील. रिलायन्स जिओने याआधीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओफाय वर ऑफर दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स जिओ व्हर्चुअली जिओफाय डोंगल मोफत देण्याची ऑफर देत होते. या ऑफरनुसार यूजर्सला १९९९ रूपये भरल्यानंतर डोंगलच्या किंमती तेवढाच मोफत डेटा देत होते. तर वॉईसची सुविधा १२ महिन्यांसाठी दिली जात होती.
आता नव्या ९९९ रूपयांच्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणा-यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल्स, २जीबी ४जी डेटा प्रति दिवस, १०० एमएमएस प्रति दिवस किंवा ६ रिचार्ज सायकलपर्यंत २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल्स, १जीबी ४जी डेटा प्रति दिवस, १०० एसएमएस प्रति दिवस देणार आहेत.
