
नवी दिल्ली : खास आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने नवी ऑफर लाँच केली आहे. ग्राहकांना या नव्या ऑफरनुसार ६० जीबी फ्री डाटा मिळणार आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल टीव्ही इन्स्टॉल करणे अनिवार्य असणार आहे.
एअरटेल टीव्ही इन्स्टॉल केल्यास मिळणार ६० जीबी डाटा फ्री
अनेक मोबाईल कंपन्या सध्या अत्यल्प दरात मोबाईल डाटा पुरवत आहेत. आता एअरटेलकडून फ्री डाटाची ऑफर लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअरटेल टीव्ही इन्स्टॉल करावा लागणार आहे. हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकांना फ्री डाटाचा बेनफिट २४ तासानंतर मिळणार आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना ६ महिन्यांपर्यंत १० जीबी डाटा देण्यात येणार आहे. याप्रमाणे ६० जीबी डाटाचा लाभ घेता येणार आहे.
‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’च्या सेटवर झालेल्या अपघातविषयी बोलली कंगना
