अॅमेझॉन आणत आहे इंस्टेंट मॅसेजिंग अॅप


नवी दिल्ली : आपले नवे इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम हे घेऊन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच येणार आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला ज्यामुळे पर्याय देणार आहे. अॅमेझॉनचा अॅनिटाईम अॅप आयओएस, अँड्राईड आणि डेस्कटॉप तिघांना सपोर्ट करणार आहे. सध्या हे अॅप टेस्टिंगमध्ये आहे आणि लवकरच लॉन्च केले जाणार आहे. तुम्ही ग्रुप चॅट, वॉईस/व्हीडियो कॉल, एन्क्रिप्शन आणि स्टिकर यासारख्या सर्विस तुम्हाला अॅमेझॉनच्या अॅनिटाईम अॅपमध्ये मिळणार आहे. यामध्ये व्हॉट्सअॅपपेक्षा अधिक ऑप्शन देखील असू शकतात. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यक्तीसोबत बोलत असताना तुमचा नंबर त्यावर दिसणार नाही. व्हॉट्सअॅप किंवा इतर अॅपमध्ये मात्र तुमचा नंबर दुसऱ्याला कळतो.