आता आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदासही रोखणार गुगल


सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीने आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन रोखणार आहे. गुगल यासाठी दोन कोटी मच्छरांची पैदास करणार आहे. गुगलचे हे मच्छर इतर मच्छरांची संख्या कमी करणार आहेत.

यासंदर्भातील वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार गुगल कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो काऊंटीमध्ये नर मच्छर सोडणार आहे. हे नर मच्छर मादा मच्छरांशी संसर्ग केल्यानंतर मादा मच्छर अंडी देतील पण या अंड्यांमधून मच्छर विकसित होणार नाहीत. डीबग फ्रेस्नो असे या योजनेचे नाव आहे. एडीज एजेप्टाय मच्छरांची संख्या कमी करणे या योजनेचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया वैज्ञानिकांनी दिली आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार पसरवायला एडीज एजेप्टाय जातीचे मच्छर मदत करतात.

फ्रेस्नो काऊंटीच्या दोन भागात २० आठवड्यांमध्ये १० लाख नर मच्छर सोडण्यात येणार आहेत. गुगलचे हे मच्छर चावणार नाहीत. हे मच्छर तयार करताना त्यांना वोलबचिया बॅक्टेरियाने संक्रमित करण्यात आले आहे. वोलबचिया हा एक प्रकारचा जीवाणू आहे जो ४० टक्के किटकांमध्ये आढळतो.

Leave a Comment