
टाटा समूहाचे बडतर्फ केलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावर टाटा ट्रस्टचे एक ट्रस्टी के.आर. वेंकटरमण यांनी मानहानीचा दावा केला असून त्यासाठी ५०० कोटींची रक्कम मागितली आहे. एक्स्पनेड मेट्रोपोलिस मॅजिस्ट्रेटसमोर हा दावा दाखल झाला असून न्यायाधीशांनी सायरस मिस्त्री व दाव्यात सहभागी असलेल्या त्यांच्या अन्य साथीदारांना २४ ऑगस्ट रोजी न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सायरस मिस्त्रींवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा
वेंकटरमण यांच्यातर्फे काम पाहात असलेले वकील परवेज मेमन यांनी दिलेल्या माहितीनुसार मिस्त्री यांनी वेंकटरमण यांच्या संदर्भात दिशाभूल करणारी माहिती दिल्याने त्यांची बदनामी झाली. यामुळे वेंकटरमण यांनी मिस्त्री यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
