
नवी दिल्ली : कोंबडीला आपण कधी पियानो वाजवताना पहिले नसेल, पण एका कोंबडीने अमेरिकेतील एका रिआलिटी शोमध्ये पियानो वाजवून उपस्थितांना चक्रावून टाकले आहे. तसेही टॅलेंट शोमध्ये उपस्थितांना आश्चर्याचे धक्के बसतात पण या शोमध्ये असे काही घडले ज्याची कल्पनाही प्रेक्षकांनी केली नसेल.
चक्क कोंबडी वाजवते पियानो !
दोन महिला एका कोंबडीला घेऊन या शोमध्ये आल्या होत्या. ही कोंबडी पियानो वाजवेल असे त्यांनी सांगितल्यावर सगळय़ांनाच हसू आवरले नाही. शोच्या जजेसनाही प्रश्न पडला की असे कसे होऊ शकते? कोंबडी पियानो कसे वाजवणार? नंतर असे काही घडले की जजसेना सन्मान म्हणून उठून उभे रहावे लागले. कोंबडीने आपल्या चोचीने पियानो वाजवायला सुरूवात केली. ते पाहून उपस्थितांना अचंबित व्हावे लागले. या कोंबडीचे नाव जोकगू होते. कोंबडी पियानो वाजवते हे पाहून उपस्थितांनी उभे राहून टाळयांचा कडकडाट केला.
