या ठिकाणी म्हशीला चरवण्यासाठी मिळतो दरमाह २५ हजार रुपये पगार


नवी दिल्ली – सर्वसाधारणपणे अनेकजण म्हशीचे दूध विकूनच पैसे कमवतात. पण, तुम्हाला म्हशीला चरविण्यासाठीही पगार मिळतो हे माहिती आहे का? आणि तोही तब्बल २५ हजार रुपये. पण हे खरे आहे. तुम्हाला आज आम्ही एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत जेथे म्हशींना चरविण्यासाठी चक्क २५ हजार रुपये पगार मिळतो.

नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरातील झट्टा गावातील शेतक-यांनी आपल्या म्हशी चरविण्यासाठी नोकरी उपलब्ध केली आहे. याबाबत आलेल्या बातम्यांनुसार ही नोकरी बिहारमधील झकस कुमार हा व्यक्ती करत असून तो ५० म्हशींना चरवतो आणि महिन्याला तब्बल २५ हजार रुपये पगारही घेतो. झकस प्रमाणेच आता बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक युवक हेच काम करत आहेत.

याबाबत माहिती देताना गावातील सोहनपाल पहलवानने सांगितले की, एवढा वेळ या ठिकाणी शेतक-यांना नसतो की म्हशींना चरविण्यासाठी घेऊन जातील. त्यामुळे शेतक-यांनी मजदुरांना आयडिया दिली की म्हशींना चरविण्यासाठी घेऊन जात जा आणि प्रत्येक म्हशीमागे ५०० ते ७०० रुपये कमवा. गावातील अनंगपाल या शेतक-याने सांगितले की, म्हशीला चरविण्यासाठी हे मजुर घेऊन जातात आणि त्यामुळे म्हैस चांगली दूधही देत आहे. प्रत्येक म्हैस आता दररोज सरासरी १० ते १५ लिटर दूध देते आणि त्यामुळे आम्हाला महिन्याला हजारो रुपयांचा फायदा होत आहे.

Leave a Comment