
मुंबई: मुंबईसहित देशभरात तिसऱ्या क्रमांकाची टेलीकॉम कंपनी आयडिया सेल्युलरने ४जी सेवा सुरु केली आहे. आयडियाने यासोबतच यूजर्ससाठी एक चांगली ऑफरही आणली आहे. आपल्या यूजर्ससाठी कंपनीने १० जीबी ४जी डेटा मोफत देणार आहे. तसेच नव्या यूजर्सलाही तीन महिन्यांपर्यंत १० जीबी डेटा देणार आहे.
आयडियाच्या ४जी सेवेला सुरुवात
याबाबत आयडियाने जाहीर केले आहे की, ही सेवा २१०० मेगाहर्त्झ स्पेक्ट्रम बॅण्डमध्ये आहे आणि सध्या मुंबई सर्कलमध्ये ४४ लाख ग्राहकांना सेवा देत आहे. कंपनीच्या या नव्या ऑफरमुळे आयडियाच्या अनेक ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. आपल्या २० सर्कलमध्ये आयडियाने ४जी सेवा सुरु केली आहे. आयडियाने ही नवी ऑफर जिओला टक्कर देण्यासाठी आणली असल्यामुळे ग्राहक आता आयडियाला पसंती देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
