आज लाँच होणार मारूती सुझुकीची नवी कार


नवी दिल्ली : कार निर्माती कंपनी मारूती सुझुकीने सब कॉम्पॅक्ट डिझाईनची डिझायर कार आज लाँच करणार असून ही कार २००० पेक्षा जास्त डिलर्सकडे उपलब्ध झालेली असेल.

अनेक कार शौकिनांनी याची ११ हजार देऊन आधीच बुकींग केली आहे. ज्या ग्राहकांनी जुने मॉडेल बुक केले असेल त्यांना त्या बदल्यात नव्या मॉडेलसाठी बुकिंग ट्रांसफर करु शकतात. तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर तुमचा नंबर देऊ शकता. त्यानंतर कंपनी तुम्हाला कॉल करेल. या नावातून कंपनीने स्वीफ्ट हे नाव हटविले आहे. डिजायर असेच फक्त नाव असणार आहे.

१.२ लीटर पेट्रोल इंजिन नव्या स्वीफ्ट डिझायरमध्ये दिले गेले आहे जे ८३ हॉर्स पॉवर देते. ११५ एनएम टॉर्क जनरेट करतो. ह्युंदाईची एक्सेंट फेसलिफ्ट, टाटाची टीगोर, होंडाची अमेझ, फोर्डची एस्पायर आणि फॉक्सवॅगन एमिओ या कार्सना मारुतीची सुझुकी डिझायर टक्कर देणार आहे.