महिन्याभरात मारुती सुझुकीने विकल्या १.४४ लाख गाड्या


मुंबई: सध्या कार कंपनी मारुती सुझुकी चांगलीच तेजीत असून २०१७-१८ आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये कंपनीने १.४४ लाखाहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१.४४ लाख गाड्यांची विक्री कंपनीने फक्त भारतात केली आहे. मागील वर्षापेक्षा गाड्यांच्या विक्रीत यंदा २३ टक्के वाढ झाली आहे. पण ३० टक्क्यांची घट निर्यातीत पाहायला मिळाली आहे. पण तरीही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार मिळून मारुती सुझुकीच्या विक्रीत जवळजवळ २० टक्के वाढ झाली आहे.

कंपनीच्या जवळजवळ प्रत्येक मॉडलेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑल्टो आणि वॅगन आर या ३९००० कारची विक्री झाली आहे. तर स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, डिझायर, बलेनो या कारच्या विक्रीमध्येही ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सियाज सारख्या कारच्या विक्रीतही २३ टक्के वाढ झाली आहे. कारच्या विक्रीत वाढ झाल्याने उत्पादनाला आणखी चालना मिळणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment