मुंबई: उद्या म्हणजेच ३ मे ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या नावाने भारतात नवा स्मार्टफोन लाँच होणार असून हा नवा स्मार्टफोन ‘स्मार्टोन’ या कंपनीने बाजारात आणला आहे.
उद्या सचिनच्या स्मार्टफोनचे लाँचिंग
या स्मार्टफोनचे नाव सचिन रमेश तेंडुलकर अर्थात ‘एसआरटी’ असे आहे. ४ जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. शिवाय फोनच्या मागे तेंडुलकरची स्वाक्षरीही असणार आहे. आपल्या नावाचा नवा स्मार्टफोन बाजारात येणार असल्याची माहिती खुद्द सचिनने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
नेमके कोणते फीचर या स्मार्टफोनमध्ये असणार याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. पण काही रिपोर्टनुसार यामध्ये ५.५ इंच डिस्प्ले, ग्लोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन असू शकते. तसेच यात ड्यूल सिम सपोर्ट, अँड्रॉईड ६.० मार्शमेलो, प्रोसेसर ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८१०, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता आहे. यासोबतच १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ४ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Ready for a surprise? We're excited & can’t wait to share it with you all. #srtphone is on its way on 3rd May'17, are you ready? #TwoOfAKind pic.twitter.com/mw5a2NYMHw
— Smartron (@smartronindia) April 28, 2017