राजकारणात मार्क झुकेरबर्ग ?


लॉस एंजिलिस – फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतःलाच अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचा दौरा करण्याचा आणि लोकांना भेटण्याचे आव्हान दिले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे मार्क यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या राजकारणात प्रवेशाची इच्छा म्हणून याकडे पाहत आहेत. आपल्या अहवालात गार्डियन आणि टेलिग्राफने देखील याचे संकेत दिले आहेत.

नव्या वर्षाच्या संकल्पांची माहिती देताना मार्क यांनी एक फेसबुक पोस्ट देखील लिहिली आहे. ३२ वर्षांच्या मार्क यांनी अमेरिकेच्या ३२ राज्यांचा दौरा करण्याची गरज असल्याचे म्हटले. मार्क देखील एकदिवस राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची घोषणा करतील असे कयास आता व्यक्त होऊ लागले आहेत. आपण पत्नी प्रिसिलासोबत प्रवास करू, छोटय़ा शहरात थांबू, विद्यापीठ आणि इतर कार्यालयांना भेट देऊ. शिक्षक, वैज्ञानिकांची भेट घेत मनोरंजन स्थळी जाऊ असे मार्क यांनी म्हटले. तर मागील आठवडय़ात मार्क यांनी आता आपण नास्तिक नसल्याचे घोषित केले होते.