सरकारची डिजिटल व्यवहारांसाठी विनामुल्य हेल्पलाइन


नवी दिल्ली – सर्व डिजिटल व्यवहारांसाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्‍नांवर उत्तरे या हेल्पलाइनवर मिळणार आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दूरसंचारचे सचिव जे. एस. दीपक यांनी दिली. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे. सर्व दूरसंचार कंपन्या या हेल्पलाइनमध्ये सहभागी असल्याने सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.

Leave a Comment