
नोटबंदी नंतर जुन्या नोटा भरायचा शेवटचा दिवस उद्यावर येऊन ठेपला असताना छत्तीसगढ सरकारने कॅशलेस मोहिमेत केंद्राच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. येथील नगरपालिकानी नोंदणीकृत सर्व छोट्या मोठ्या दुकानांना व व्यावसायिकांना पीओएस मशीन वापरणे बंधनकारक केले आहे. यामुळे हे राज्य देशातील पहिले कॅशलेस राज्य बनण्यासाठी जोरदार प्रयत्नशील झाले असल्याचे सांगितले जात आहे. पीओएस मशीन वापर बंधनकारक करणारे हे देशातले पहिले राज्य आहे.
छत्तीसगढमध्ये स्वाईप मशीन वापर बंधनकारक
अर्थात येथील व्यापारी व दुकानदारांच्या मते पीओएस मशीन वापर वाटतो तितका सोईचा नाही. येथे कार्ड वापरणार्या नागरिकांची संख्या कमी आहे तसेच छोट्या दुकानदारांना मशीनचा खर्च करणे परवडणारे नाही. त्यातच राज्यात अशा व्यवहारांबाबत पुरेशी जागृती झालेली नाही. नोटबंदीपासून ५० टक्के व्यवसाय ठप्प झालेला आहे अशा वेळी सरकारने कॅशचे प्रमाण वाढवायला हवे असे मत व्यापारी व्यक्त करत आहेत.
