
मुंबई : ख्रिसमससाठी आपल्या उत्पादनांवर स्मार्टफोन बनवणारी कंपनी शाओमीने भरघोस सूट दिली असून यात स्मार्टफोन, पॉवर बँक आणि हेडफोन्सवर ख्रिसमस सेलअंतर्गत घसघशीत सवलत दिली आहे.
शाओमीच्या ख्रिसमस सेलअंतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर भरघोस सूट
शाओमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन एमआय५, ज्याची किंमत 19999 रुपये आहे, त्यावर ३००० ची सूट देण्यात आली आहे. शाओमीची २०००० क्षमतेची पॉवरबँक १८९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल, ज्यावर ६०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर १०००० क्षमतेची पॉवरबँक ९९९ रुपयांना उपलब्ध असेल. या पॉवरबँकवर ३०० रुपयांची सवलत देण्यात येईल. शाओमीच्या हेडफोन्सवर २०० रुपयांची सूट देण्यात आल्यामुळे १७९९ रुपयांचे हेडफोन्स १५९९ रुपयांना मिळणार आहेत. शाओमीने आपल्या उत्पादनांवर मोठी सूट देत आहे. सोबतच एक वर्षासाठी हंगामा म्युझिकचे सबस्क्रीप्शनही मोफत दिले जाणार आहे.
