झोपोचा कलर एफ टू स्मार्टफोन भारतात

zopo
झोपोने त्यांचा नवा कलर एफ टू हा स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. या फोनला मल्टी फंक्शनल फिंगरप्रिंट सेन्सर बॅक पॅनलवर दिला गेला आहे. याच्या मदतीने फोनमधील अनेक फिचर्स कंट्रोल करणे शक्य होणार आहे. या फोनची किंमत १०७९० रूपये असून तो मुंबई मार्केटमध्येही उपलब्ध असल्याचे कंपनीने कळविले आहे.

हा फोन ड्युअल सिम सह आहे. त्याला ५.५ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, २ जीबी रॅम, ८ एमपीचा एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा व अँड्राईड मार्शमेलो ६.० वर आधारित कंपनीची स्वतःची स्क्रीन दिली गेली आहे. कनेक्टिव्हीटीसाठी फोर जी, एलटीई, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी पोर्ट असे ऑप्शन्स आहेत.