अवघ्या ४ तासात देशाचे १५ लाख कोटींचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर

nota
पंतप्रधान मोदींची तातडीच्या निवेदनात मंगळवार मध्यरात्रीपासून चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर चार तासात देशातील १५ लाख कोटी रूपयांचे चलन अर्थव्यवस्थेबाहेर केले आहे. हा आकडा एकूण चलनाच्या ८७ टक्के इतका आहे याचाच अर्थ पुढचे कांही दिवस देशाचे अर्थव्यवहार १३ टक्के चलनावर सुरू राहणार आहेत. अर्थात मोठ्या नोटा रद्द करण्याची ही देशातील पहिली वेळ नाही. यापूर्वीही १९४६ व १९७८ मध्ये असे निर्णय घेतले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार १० हजार रूपये मूल्याची नोट देशात प्रथम १९३८ मध्ये व त्यानंतर १९५४ मध्ये छापल्या गेल्या होत्या. त्या अ्रनुक्रमे जानेवारी १९४६ व जानेवारी १९७८ साली बंद केल्या गेल्या. सध्या ५०० रूपयांच्या १६५० कोटी नोटा चलनात आहेत याचाच अर्थ या नोटांच्या रूपाने ८.२५ लाख कोटी रूपये चलनात आहेत. तसेच १ हजार रूपयांच्या ६७० कोटी नोटा म्हणजे ६,७० लाख कोटी रूपये चलनात आहेत. त्या सर्व नोटा आता बाद ठरल्या आहेत. पाचशे रूपयांची नोट १९८७ मध्ये चलनात आणली गेली होती.

Leave a Comment