सॅमसंगपाठोपाठ आता रिलायन्सच्या स्मार्टफोनचा स्फोट

reliance
नवी दिल्ली – एका ग्राहकाने रिलायन्स रिटेलमधून विकत घेतलेल्या ४ जी लाइफ फोनचा स्फोट झाल्याचा दावा केला असून रिलायन्सने त्याच्या या दाव्यानंतर चौकशीचे आदेश दिले आहेत.

मी आणि माझे कुटुंबीय रिलायन्स ४ जी लाइफच्या स्फोटातून थोडक्यात बचावलो असल्याचे तन्वीर सादिक या ग्राहकाने म्हटले आहे. सादिक यांनी हा फोन जपून वापरा असा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटर हॅंडलवरुन त्याने ही माहिती दिली. त्यानंतर रिलायन्सच्या लाइफ स्मार्टफोन या हॅंडलवरुन त्वरित प्रतिसाद मिळाला आणि या घटनेची आपण दखल घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. या घटनेची आम्ही सखोल चौकशी करू असे कंपनीने म्हटले आहे. रिलायन्सने जिओ सिम लाँच केल्यानंतर त्यांनी लगेचच ४ जी लाइफ हे स्मार्टफोन बाजारात आणले. त्याच फोनचा स्फोट झाल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Comment