
मुंबई : लवकरच ग्राहकांसमोर भारतात बनविल्या जाणाऱ्या ‘चॅम्पवन सी१’ नावाचा एक स्मार्टफोन येत आहे. या फोनची खरी किंमत ८००० रुपयांची असली तरी १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फ्लॅश सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
केवळ ५०१ रुपयात ८००० रुपयांचा स्मार्टफोन!
५०१ रुपयांत फोन मिळवण्यासाठी ग्राहकांना सुरुवातील ५१ रुपयांचा एक ‘चॅम्पवन क्लीन मास्टर’ नावाचे एक मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध झाले आहे. यामध्ये विचारलेली माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर confirm order वर क्लिक करावे लागले. ही प्रोसेस पूर्ण करणाऱ्या ग्राहकांनाच हा फोन सेलमध्ये उपलब्ध होऊ शकेल. ५०१ रुपयांना ग्राहकांना मिळालेला फोन त्यांना केवळ कॅश ऑन डिलिव्हरीवर घरपोच मिळेल. उल्लेखनीय म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीही ‘चॅम्पवन इंडिया’ कंपनीनं असाच फ्लॅश सेल जाहीर केला होता… त्यानंतर मात्र तो कधी झालाच नाही.
