
हैदराबाद – हैदराबादमधील जवळपास ५० आयटी कंपन्यांना गेल्या दहा दिवसांपासून पाकिस्तानी हॅकर्सने टार्गेट केले असून ‘सोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटी काऊन्सिल’ (SCSC)सह शहरातील मोठ्या कंपन्यांचाही या सायबर हल्ल्यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साईटवरुन कुणीतरी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न असल्याचे निर्दशनास आल्यानंतर सोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटीला ही बाब समजली.
हैदराबादमधील कंपन्यांवर पाकिस्तानी हॅकर्सचा डल्ला
भारतीय कंपन्यांवर सायबर अटॅक करण्यासाठी पाकिस्तानी हॅकर्स तुर्की, सोमालिया आणि सौदी अरेबियामधून सर्व्हर वापरत आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षा फोरमच्या अधिका-यांनी दिली आहे.या हल्ल्यानंतर काही समस्या सोडवण्यात आल्या आहेत, मात्र अन्य कंपन्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये येथे झालेले सायबर अटॅक हे पाकिस्तानातून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काही कंपन्यांनी याबाबत तक्रार नोंदवत आयटी कॉरीडोरच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
