फेसबुकने ब्लॉक केला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो

breast-feeding
न्यूयॉर्क – सोशल साइटवर अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने एक फोटो पोस्ट केल्यानंतर तिला टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर रेबेका नावाच्या महिलेने दोन मुलांना स्तनपान करत असतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर तिच्यावर चहूबाजुंनी टीका होत आहे.

दरम्यान काही यूजर्सनी सकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. काही लोकांनी या फोटोला खूपच सुंदर व चांगला फोटो संबोधले आहे तर काहींनी मन दुखावणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रेबेकाचे अकाउंटही फेसबुकने ब्लॉक केले होते परंतु काही वेळाने पुन्हा अनब्लॉक करण्यात आले.

फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, ब्रेस्टफीडिंगचा फोटो अपलोड केला जाऊ शकतो. ही एक सामान्य व नैसर्गिक गोष्ट आहे. स्तनपान प्रत्येक आईसाठी महत्वपूर्ण बाब असते. ती तिचा अनुभव फेसबुकवर शेअर करू शकते.

एखाद्या महिलेने आपल्या शरीराचा भाव अशा रितीने सोशल साईटवर टाकणे, अशी घटना काही पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीही इंस्टाग्रामवर मासिक धर्मचा फोटो पोस्ट केल्यानंतर एका महिलेवर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. रेबेकाने सांगितले की, सर्जरी झालेल्या तिच्या एका मैत्रिणींने तिला मुलाला स्तनपान करण्यास सांगितले. त्यानंतर तिने तो फोटो पोस्ट केला व त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.

Leave a Comment