
नवी दिल्ली: अनेक ऑनलाईन रिटेलर्स एक्सचेंज ऑफर आणि कॅश बॅक ऑफर आयफोन या स्मार्टफोनवर देत आहेत. आता देशातील सर्वात मोठी टेलोकॉम कंपनी एअरटेल सुद्धा या स्पर्धेत सामिल झाली आहे. एअरटेलच्या ऑनलाईन आणि रिटेल स्टोरमध्ये जाऊन आयफोन ७ केवळ १९ हजार ९९० रूपयांमध्ये १२ महिन्यांच्या करारावर खरेदी करता येत आहे. यासाठी ग्राहकांना एअरटेलचा ‘इनफिनिटी प्लान’ घ्यावा लागेल.
एअरटेलची धमाकेदार ऑफर; मिळणार १९ हजार ९९० मध्ये आयफोन ७
३२ जीबी आयफोन ७ च्या बेस मॉडेलची किंमत ५९,९९८ रूपये आहे, हा स्मार्टफोन तुम्ही १९ हजार ९९० रूपयांमध्ये मिळवू शकता. यासाठी तुम्हाला एअरटेलचा १९९९ आणि २४९९ इनफिनिटी प्लानपैकी एक निवडावा लागेल. १९९९ प्लानमध्ये तुम्हाला ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल एसटीडी कॉलिंग मिळणार, तेच २४९९ च्या प्लानमध्ये १० जीबी ४जी डेटा दिला जाणार आहे. यासोबत विंक म्युझिक आणि मुव्ही फ्रि सब्सक्रिप्शनही दिलं जाणार आहे.

याप्रकारे तुम्ही आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसचे सर्व मॉडेल १२ महिन्यांच्या करारावर घेऊ शकता. ज्याची किंमत मॉडेलनुसार ठरवली जाईल. यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जिओने आयफोनच्या अनेक मॉडेलवर १२ महिन्यांसाठी फ्रि डेटा आणि कॉलिंगची घोषणा केली होती. जिओची ही सर्व्हिस आयफोन ६, आयफोन ६ एस, आयफोन ६एस प्लस, आयफोन एसई आणि आयफोन ७ वर मिळत आहे.
