लवकरच २ लाख सामान्य सुविधा केंद्रात मिळणार पीएफ सुविधा

pf
नवी दिल्ली – कर्मचारी भविष्यनिधी संघटना (ईपीएफओ) ही देशभरातील आपल्या सदस्यांना तत्काळ सेवा देण्यासाठी सामान्य सुविधा केंद्रातही (सीएससी) सेवा सुरू करणार आहे. या संघटनेच्या सुविधांचा लाभ सदस्यांना देशभरातील साधारण २ लाख केंद्रांमध्ये घेता येईल. ईपीएफओ संघटनेने ऑनलाईन पीएफ काढण्याबरोबरच आधार कार्डच्या सहाय्याने युएएन जोडणीला प्रारंभ करण्यात येणार आहे. ७.८४ कोटी युएएन आधारित सदस्यांना सेवा देण्यासाठी ईपीएफओ आणि तंत्रज्ञान मंत्रालयात लवकरच करार करण्यात येणार आहे.

संघटनेच्या संकेतस्थळानुसार आतापर्यंत २.९३ कोटी युएएन खाती सक्रिय आहेत. युएएन धारकांना नोकरी बदलताना पीएफ खाते बदलण्याची आवश्यकता नाही. या नवीन सेवेमुळे औद्योगिक कामगारांना ई-केवायसी आणि युएएन सक्रिय करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याचबरोबर निवृत्तीवेतन आणि पीएफमधील रक्कम काढणे याचा लाभ देशभरातील विविध सीएससी केंद्रातून घेता येईल. सध्या सुरू असणाऱया आर्थिक वर्षात पीएफमधील रक्कम ऑनलाईन काढणे आणि निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न आहे.

Leave a Comment